Donde, Donde Lyrics by Gilda Gilda
Below, you will find the lyrics for Donde, Donde by Gilda.
ठाऊक नाही मज काही
ठाऊक नाही मज काही
ठाऊक आहे का तुज काही
कशी होती रे माझी आई
कशी होती रे माझी आई
मऊ जशी ती साय दुधाची
होती आई का तशी मायेची
मऊ जशी ती साय दुधाची
होती आई का तशी मायेची
बागेतील ते कमल मनोहर
आई होती का तशीच सुंदर
देवाघरी का एकटी जाई
ठाऊक आहे का तुज काही
कशी होती रे माझी आई
कशी होती रे माझी आई
चिऊकाऊची कथा चिमुकली
सांगत होती का ती सगळी
चिऊकाऊची कथा चिमुकली
सांगत होती का ती सगळी
अम्हांसारखे शुंभ करोती
म्हणत होती का देवापुढ़ती
गात असे का ती अंगाई
ठाऊक आहे का तुज काही
कशी होती रे माझी आई
कशी होती रे माझी आई
मऊ सायीहून आई प्रेमळ
गंगेहून ती आहे निर्मळ
अमृताचे घास भरविते
आभाळापरी माया करते
आईवाचुन मीही विरही
ठाऊक आहे का तुज काही
कशी होती रे माझी आई
कशी होती रे माझी आई
Did you like these lyrics?
Apple and App Store are trademarks of Apple Inc.
Google Play and the Google Play logo are trademarks of Google LLC.